जामनेर तालुक्यातील तेली समाजाचे निस्वार्थ समाजसेवक अजय भाऊ अशोक चौधरी यांची महाराष्ट्रात मोठ्या पदावर नियुक्ती!

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
प्रतिनिधी सुपडू जाधव

जामनेर तालुक्यातील तेली समाजाच्या निस्वार्थ समाजसेवेसाठी सतत कार्यरत असलेल्या अजय भाऊ अशोक चौधरी यांची श्री संताजी नवयुवक मंडळ, महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठित संस्थेच्या उत्तर महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी घाटे साहेब यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत चौधरी यांची ही नियुक्ती जाहीर केली. अजय भाऊ चौधरी यांनी तेली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी अनेक वर्षे निस्वार्थ सेवा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या हिताचे अनेक उपक्रम राबवले गेले आहेत.

यावेळी संस्थेचे माहिती अध्यक्ष श्री भटू पुंडलिक नेरकर यांनीही अजय भाऊ चौधरी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या नियुक्तीमुळे जामनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Don't Try To Copy !!