यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर तालुक्याची नेते दिलीप खोडपे सर,फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, युवा नेते विश्वतेराजे पाटील, व्ही जी एन टी सेलचे तालुका अध्यक्ष रोहन राठोड, कार्तिक भाऊ काळे,वासुदेव भाऊ साखरे, विकास अहिरे, पत्रकार महेंद्र पाटील, बी जी माळी सर,चरण सिंग पाटील,रवी माळी, आकाश बावस्कर संपुर्ण आत्मसन्मान टिम बोदवड आदी उपस्थित होते.

आत्मसमान फाउंडेशन संचलित बोदवड येथील मनोरुग्ण,बेसहारा, मानसिक व बौध्दीक अपंगत्व आलेले लोकांचा सांभाळ करण्याचे व त्यांचा उपचार करण्याची काम आत्म सन्मान फाउंडेशन करीत आहे तरी अशा लोकांना शेळगाव येथील उप सरपंच निळकंठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनावश्यक खर्च न करता आज 21 मार्च रोजी अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
