तरुणाला आर्थिक मदत करण्यासाठी मित्रपरिवारा कडून सोशलमिडिया वरती आवाहण

वाकी खुर्द (ता. जामनेर) येथील २२ वर्षीय तरुण रितेश शांताराम माहोर याला भीषण अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. काल ट्रक आणि मोटारसायकलच्या अपघातात त्याला जबर मार लागला असून सध्या छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे.

रितेशच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून, आतापर्यंतच्या उपचारांसाठी २ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. पुढील उपचारांसाठी सुमारे ५ लाख रुपयांची गरज आहे. त्याच्या कुटुंबीयांसाठी ही मोठी आर्थिक अडचण असल्यामुळे सर्व समाज बांधवांनी आपल्या परीने आर्थिक मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आपली मदत थेट पोहोचवण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करून आर्थिक मदत करता येईल. छोट्या मदतीतूनही मोठा आधार मिळू शकतो. आपली मदत रितेशला नवजीवन देऊ शकते!

(कृपया अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संपर्कावर संपर्क साधावा.)

error: Don't Try To Copy !!