जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत गरुड विद्यालयाचे घवघवीत यश

धी शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑप सोसायटीचे
आ.ग.र गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथील विद्यार्थ्यांचे तायक्वांदो स्पर्धेत यश व विभागावर निवळ नुकत्याच जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेतील ज्या विद्यार्थ्यांची जिल्ह्यावर निवड झाली यापैकी 11 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून नुकताच जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेतून विजयी होत.सुवर्णपदक प्राप्त विजेते विद्यार्थी केवीन रवींद्र चौधरी, दक्ष लोखंडे,प्रद्युम्न जगताप,आर्यन वानखेडे,साहिल शेलार,चिन्मय सुर्वे, रागिणी पाटील,दृष्टी भारुडे,कामिनी नाथ,विनायक भोई,या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले असून त्यांची विभागावर निवड झालेली आहे. तायक्वांदो स्पर्धेत 11 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले 4 विद्यार्थ्यांना रौप्य पदक मिळालेले आहे .

या 11 विद्यार्थ्यांची विभागावर निवड झालेली आहे.म्हणून या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजय रावजी गरुड व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शेळके,सचिव काकासोसागर मलजी जैन,सहसचिव दादासो यु यु पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड,वस्तीगृह सचिव गो गो सूर्यवंशी,विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी, पर्यवेक्षक व्ही.एम शिरपुरे,पर्यवेक्षक विनोद पाटील या मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे देखील अभिनंदन केले.
तसेच फिजिकल टीचर पी पी पाटील,
अमोल पाटील,आर.एम.सपकाळे,
पी एम पाटील,सचिन सुर्वे इत्यादी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

error: Don't Try To Copy !!