दिनांक 01/112025
जे बी एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (जब्बार तडवी)
अवैध वृक्षतोड करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजने चे ही बोगस काम करून वाजवले रोड चे तीन तेरा.. मात्र अभियंता.. उप अभियंता गाढ झोपेत.
या हुकूमशाहीला कंटाळून शेतकरी त्रस्त झाला आहे
.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नांदा. तांडा ते चारूतांडा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सध्याला कोट्यावधी रुपयांचे रोड चे काम सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे बोगस काम सुरू असून या कामावरती थातूरमातूर मुरूम निकृष्ट दर्जाचे बोगस मटेरियल वापरले जात आहे. त्यावरती रोलर ने व्यवस्थित दबाई केली जात नाही.त्यामुळे पूर्ण गिट्टी वरती पडलेली आहे तसेच या रोडला कोणतीही साईड ड्रम नाली काढलेली नाही त्यामुळे या ठिकाणी पाणी साचून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची व शेताची मोठी हानी होऊन नुकसान होत आहे असा संताप जनक प्रकार शेतकऱ्यांनी सांगितला आहे. तसेच मुरमाचे खोदकाम सुरू असताना शिवसाई या कंट्रक्शनच्या मालकाने कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे अवैध रित्या सागवान,लिंब, व इतर प्रजातीच्या वृक्षांची सर्रासपणे पोकलँड च्या साह्याने कत्तल करून हुकूमशाही चा तांडव माजवलेला आहे. शिवसाई कंट्रक्शन हे बोगस काम करून कोट्यावधी रुपयांचा शासनाला चुना लावून शिवसाई कंट्रक्शन फक्त पैसा कमाविण्याचे एक गोरख धंदा करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले .मागील वर्षी याच कंट्रक्शन ने नांदा.गाव येथे पुलाचे निकृष्ट दर्जाचे बोगस काम केले होते.त्या संदर्भामध्ये गावकऱ्यांनी हे बोगस काम अडविले सुद्धा होते. व अनेक ग्रामस्थांची तक्रार सुद्धा होती त्याच पद्धतीने परत या रोडचे पूर्ण बोगस काम शिवसाई कंट्रक्शन ने सुरू केलेले आहे तरी या हुकूमशाही करणाऱ्या शिवसाई कंट्रक्शन वरती तात्काळ शासनाने, प्रशासनाने कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे. अवैध कत्तल केलेल्या वृक्षांचा पंचनामा अजिंठा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सावळदबारा वन परिमंडळ च्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा करून पुढील कारवाईसाठी तपास सुरू आहे
