बेटावद खुर्द येथे घरफोडी

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
प्रतिनिधी जामनेर
जामनेर : मुलगा दवाखान्याच्या कामासाठी मुंबईला गेल्याने त्याला उपचारासाठी आईने चांदीच्या पाटल्या विकून मिळालेले २० हजार व ५० हजाराचे सोन्याचे दागिने लोखंडी पेटीत ठेवले. मात्र चोरट्यांनी गुरुवारी रात्री घरफोडी करीत ७० हजाराचा मुद्देमाल लांबवल्याची घटना बेटावद खुर्द येथे घडली. राजेंद्र सुपडू पाटील (बेटावद खुर्द, ता. जामनेर) यांचे मोठे भाऊ दवाखान्याच्या कामासाठी मुंबईला गेले होते. २० हजाराची रोकड, २० ग्रॅमची सोन्याची पोत व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा ऐवज त्यांनी लोखंडी पेटीत ठेवला. खोलीला कुलूप लावून शेजारच्या घरात झोपायला गेले असताना ही चोरी झाली.

error: Don't Try To Copy !!