शेंदुर्णी नगरपंचायत रणधुमाळीस सुरुवात… आज नगराध्यपदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ६ अर्ज दाखल.

शेंदुर्णी – शेंदुर्णी नगर पंचायतीची रणधुमाळीस आज पासून सुरुवात झाली. आज येथील शेंदुर्णी नगरपंचायत निवडणूक २०२५ साठी आज एकूण ७ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले असून त्यात नगराध्यक्ष पदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ६ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली आहेत.
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणूक २०२५ साठी दिनांक १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख असून
आज दिनांक १४/११/२०२५ रोजी नगराध्यक्ष पदासाठी सूर्यवंशी युवराज कडोबा यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. प्रभाग क्रमांक १ मधून नगर सेवक पदासाठी १) विलास ओंकार अहिरे यांनी पहिले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. प्रभाग क्रमांक १४) मध्ये १) गुजर सविता राजेंद्र ,२)काझी जूबिया परवीन निजामुद्दीन , प्रभाग क्रमांक ६)सूर्यवंशी गायत्री युवराज , प्रभाग क्रमांक ९) बारी निकिता अतुल , प्रभाग क्रमांक १७) बारी अतुल प्रल्हाद या प्रमाणे नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहे.

error: Don't Try To Copy !!