मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची तब्येत अचानक बिघडली; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी (दि. ५ मार्च २०२६) विधानभवनात कामकाज सुरू असताना मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची अचानक तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबई येथील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालय व संशोधन केंद्र येथे दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे नेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून आमदार पाटील यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

सध्या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी दिली आहे.

error: Don't Try To Copy !!