आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा
जळगांव | प्रतिनिधीपोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही!आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारापुणे | प्रतिनिधीअंगणवाडीतील बालके आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पोषण आहारात कोणत्याही प्रकारची गडबड, निष्काळजीपणा किंवा निकृष्ट दर्जाचा आहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीतील पोषण आहारासंदर्भातील प्रकार समोर आल्यानंतर पुणे जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध धान्य तसेच शिजवला जाणारा पोषण आहार तपासण्यात येणार आहे.आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अधिनस्त मुख्यसेविका आणि पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तपासणीमध्ये पोषण आहार खराब किंवा अयोग्य दर्जाचा आढळल्यास तो संबंधित पुरवठादाराकडून तात्काळ बदलून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. तसेच पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.बालकांच्या पोषण आणि आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आदिती तटकरे यांनी दिल्याने अंगणवाडी प्रशासन आणि संबंधित पुरवठादारांमध्ये आता सतर्कता वाढली आहे.
अंगणवाडीतील बालके आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पोषण आहारात कोणत्याही प्रकारची गडबड, निष्काळजीपणा किंवा निकृष्ट दर्जाचा आहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीतील पोषण आहारासंदर्भातील प्रकार समोर आल्यानंतर पुणे जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध धान्य तसेच शिजवला जाणारा पोषण आहार तपासण्यात येणार आहे.
आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अधिनस्त मुख्यसेविका आणि पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तपासणीमध्ये पोषण आहार खराब किंवा अयोग्य दर्जाचा आढळल्यास तो संबंधित पुरवठादाराकडून तात्काळ बदलून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. तसेच पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बालकांच्या पोषण आणि आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आदिती तटकरे यांनी दिल्याने अंगणवाडी प्रशासन आणि संबंधित पुरवठादारांमध्ये आता सतर्कता वाढली आहे.





