निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल मालदाभाडी चे घवघवीत यश

जामनेर:- 25/08/2026अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य शाखा जामनेर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, मालदाभाडी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये पाचवी ते सातवी च्या पहिल्या गटात कु. मोहिनी जितेंद्र पाटील द्वितीय व याच गटात कु. नेहा दिलीप परखड हीने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच आठवी ते दहावीच्या गटात कु. पूर्वी संतोष नानोटे हीने द्वितीय क्रमांक मिळविला. या स्पर्धकांचा शाळेचे मुख्याध्यापक एस आर शिकोकार यांनी सत्कार केला. तसेच मार्गदर्शक विजय सैतवाल सर यांचे कौतुक केले. शाळेत शुद्धलेखन सराव व मुद्देसूद विषय मांडणीचे मार्गदर्शन मराठी विषय शिक्षक विजय सैतवाल सरांनी आम्हाला केले यामुळेच आम्ही यश संपादन करु शकलो असे स्पर्धकांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस. पाटील यांनी केले तर आभार आर. एल. कोळी यांनी मानले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ए. बी. पाटील, श्रीमती एस. एस. सोनवणे, श्रीमती के. आर. सुरवाडे, मनोज जैन यांसह पंचक्रोशीतील मान्यवर, गावकरी यांनी अभिनंदन केले आहे

error: Don't Try To Copy !!