नेरी येथे रस्ता रोको आंदोलन; दहा दिवसांत महामार्ग दुरुस्तीचे आश्वासन

जामनेर तालुका | नेरी :25/08/2026 जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गाची झालेली दुरवस्था आणि रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जामनेर तालुक्यातील नेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलनामुळे जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून येत्या दहा दिवसांत रस्त्यावरील दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतले.

मात्र, दहा दिवसांच्या मुदतीत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या वतीने देण्यात आला आहे.

महामार्गाची तातडीने दुरुस्ती करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

error: Don't Try To Copy !!