उज्जैन (मध्य प्रदेश) येथे भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्या उपस्थित

उज्जैन (मध्य प्रदेश) येथे भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्या उपस्थित.

बाबासाहेब यांच्या जन्मस्थान महू (मध्यप्रदेश) येथे भेट देऊन भूमीला नतमस्तक.

भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ या मोहिमेअंतर्गत, भारतीय जनता पक्ष १४ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन बाबा साहेब यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवणार असून, आज त्याच अभियानाचा भाग म्हणून उज्जैन (मध्य प्रदेश) येथे भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

संविधानाची निर्मिती साकार करून, बाबासाहेबांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा आणि कोट्यवधी लोकांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली, भाजपा सरकारने बाबा साहेबांच्या महान तत्वांचे अनुसरण करून, आज भाजपा ‘विकसित भारत’ चा संकल्प साध्य करण्यात प्रयत्नशील आहे. प्रत्येक घटकाचा विकास आणि सामाजिक सलोखा हे भाजपा चे ध्येय आहे. असे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले.

तसेच यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान असलेले महू (मध्यप्रदेश) येथे भेट देऊन या पवित्र भूमीला नतमस्तक करून त्यांच्या विचारांची, संघर्षांची आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची जाणीव पुन्हा नव्याने केली. व शिक्षण, समता आणि न्यायासाठी झगडण्याची नवी ऊर्जा मिळाली. त्या मातीला स्पर्श करून मन विचारांच्या तेजाने उजळून निघालं. बाबासाहेबांनी दिलेला स्वाभिमान, शिक्षण आणि न्यायाचं बळ मनाला पुन्हा एकदा जाणीव करून देऊन गेलं. असे उद्गार यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी काढले.

error: Don't Try To Copy !!