पहूर | प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर येथे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी आयोजित विशेष डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) शिबिरास लाभार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आधार आणि बँक खात्यांच्या लिंकिंगसह आधार अपडेट करण्याच्या सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्या.
शहर किंवा तहसील कार्यालयात जाऊन आधार लिंकिंग करणे हा प्रक्रिया वृद्ध, दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत असल्याने उपसरपंच राजू जाधव यांच्या पुढाकाराने आणि तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे यांच्या सहकार्याने हे शिबिर पहूर ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन मा. जिल्हाधिकारी जळगाव श्री. आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदार श्रीमती माया शिवदे तसेच सहायक महसूल अधिकारी श्री. सुहास कोटे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
शिबिरावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. राजधर पांढरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. वासुदेव घोंगडे, सरपंच श्री. अब्बू तडवी, माजी उपसरपंच श्री. रवींद्र मोरे आणि श्री. चेतन रोकडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी श्रीमती पूजा नागरे, श्रीमती पल्लवी सोळुंके, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी श्री. भूषण राजपूत, श्री. आनंदा शिंदे व श्री. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष सेवा देत लाभार्थ्यांना आधार लिंकिंग, बँक खाते लिंकिंग आणि इतर प्रक्रिया समजावून सांगितल्या.
या शिबिराला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून गावकऱ्यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. शासनाच्या सेवा घरपोच मिळाल्याने समाधान व्यक्त करत संयोजकांचे आभार मानण्यात आले
