तोरनाळा येथे महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी

तोरनाळा (ता. जामनेर) | प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील तोरनाळा येथे आज महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास मंत्री ना. गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक तथा जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत (चंदू भाऊ) बाविस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

त्यांच्यासह कार्यक्रमाला गणेश भाऊ राजपूत (माजी जिल्हा परिषद सदस्य, बुलढाणा), मयूर भाऊ पाटील (तालुका अध्यक्ष, जामनेर), नवल भाऊ पाटील (माजी सभापती, जामनेर), युवराज भाऊ पाटील (माजी सरपंच, तोरनाळा), विश्वजीत भाऊ (जामनेर), रमेश भाऊ राजपूत (सदस्य, ग्रामपंचायत तोरनाळा), तसेच आरोग्यदूत जालमसिंग भाऊ राजपूत (जामनेर) हे सन्माननीय उपस्थित होते.

कार्यक्रमास तोरनाळा व परिसरातील कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकत प्रेरणादायी विचार मांडले.

error: Don't Try To Copy !!