जामनेर (प्रतिनिधी) जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी आज संपन्न झाली या छाननेत वार्ड क्रमांक 11 ब च्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार उज्वला दीपक तायडे या बिनविरोध झाले आहेत त्यांच्या विरोधातील मंगला – भगवान खोडपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता उमेदवारी अर्जतील प्रतिज्ञापत्र चूक असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी दरम्यान बाद ठरवला आहे. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांचे स्वियसहाय्यक दीपक तायडे यांच्या सौभाग्यवती उज्वला दीपक तायडे या बिनविरोध
निवड झाल्याची घोषणा याप्रसंगी करण्यात आली.बिनविरोध झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मतदाना आधीच नगरसेवक पदाचे पहिले खाते उघडले आणि यामुळे सर्वत्र जामनेर तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी तसेच जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी उज्वला दीपक तायडे यांना पुष्पगुच्छ दिले तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेसमोर फटाके फोडत पुष्पगुच्छ देत विजयी उमेदवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
