वाकडी गरुड विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी. एस. पाटील यांना राज्यस्तरीय “महाराष्ट्र भूषण २०२६” पुरस्कार

जामनेर (प्रतीनिधी) वाकडी गरुड विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पी. एस. पाटील (अप्पासाहेब) यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय “महाराष्ट्र भूषण २०२६” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निसर्ग मित्र समिती जळगाव व सार्वजनिक सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान प्रदान करण्यात आला.

नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते श्री पाटील सरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री पी. एस. पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, “पाणी अडवा–पाणी जिरवा” उपक्रम, पशू-पक्षी संवर्धन तसेच प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान

यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबवून समाजात जनजागृती केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान देण्यात आला.

या कार्यक्रमास जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष, संचालक मंडळ तसेच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री पी. एस. पाटील यांना मिळालेल्या या गौरवाबद्दल धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन आदरणीय दादासाहेब संजयराव गरुड, उपाध्यक्ष आबासाहेब भीमराव शेळके, सचिव सागरमल जैन, सहसचिव यु. यु. पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दिपक गरुड व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले. तसेच अण्णासाहेब भास्करराव गरुड माध्यमिक विद्यालय चे पर्यवेक्षक श्री ए. डी. राजपूत, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही पाटील सरांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Don't Try To Copy !!