जळगावात पोलीस पाटलांसाठी विशेष कार्यशाळा; कायदा-सुव्यवस्थेला बळकटी

जळगाव, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा जिल्हा नियोजन सभागृहात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस जिल्हाभरातील पोलीस पाटलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी श्री. श्रीमंत हारकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच अपर जिल्हादंडाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विविध विभागांच्या

तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
महसूल प्रशासनासंदर्भात उपविभागीय दंडाधिकारी (फैजपूर) श्री. बबन काकडे यांनी पोलीस पाटलांची भूमिका स्पष्ट केली, तर उपविभागीय पोलीस अधिकारी (जळगाव) श्री. नितीन गणापुरे यांनी गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस दलाशी समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. नरवीर रावळ यांनी आपत्तीच्या काळात प्रथम प्रतिसादक म्हणून पोलीस पाटलांची जबाबदारी विशद केली. तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती अर्चना मोरे यांनी आचारसंहिता पालन व सुरक्षित मतदान प्रक्रियेतील कर्तव्यांबाबत माहिती दिली.
गाव पातळीवर प्रशासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील कार्यरत असून त्यांच्या सजगतेमुळे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होते. या कार्यशाळेमुळे

त्यांच्या कामकाजात अधिक स्पष्टता व गती येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
“पोलीस पाटील हे गावातील प्रशासनाचे डोळे आणि कान आहेत. त्यांच्या सजगतेमुळेच ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचे पालन सुलभ होते,” असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले.
जिल्हा प्रशासनाने अशा प्रशिक्षणात्मक उपक्रमांद्वारे ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम व उत्तरदायी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
[10:03 am, 9/4/2026] Kiran Jio Number: मुंबई, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात ही बैठक झाली.
बैठकीत वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी सूतगिरणीच्या सद्यस्थितीचा आढावा सादर करत कामकाजातील अडचणी व प्रलंबित मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूतगिरणीच्या कार्यपद्धती, तांत्रिक बाबी व उत्पादन क्षमतेसंदर्भात चर्चा केली.
सूतगिरणीसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत मंत्री श्री. महाजन यांनी वस्त्रोद्योग विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामुळे सूतगिरणीच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या बैठकीस वस्त्रोद्योग आयुक्त श्री. संजय दैने, मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव श्री. प्रल्हाद रोडे, मंत्री श्री. महाजन यांचे खाजगी सचिव जयराज कारभारी, प्रादेशिक उपआयुक्त श्री. दीपक खांडेकर, कक्ष अधिकारी श्री. हरीशकुमार कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते.
सदर बैठकीत सूतगिरणीच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला असून, लवकरच ठोस निर्णयांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

error: Don't Try To Copy !!