जामनेर | प्रतिनिधी
अमळनेर : तालुक्यातील खवरी येथे तलावात बुडून १० वर्षीय मुलासह त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वीरेंद्र अण्णा तलवारे यांचा १० वर्षीय मुलगा सकाळी तलावात गेला असता तो पाण्यात बुडू लागला. मुलाला बुडताना पाहून त्याचे वडील अण्णा एकनाथ तलवारे यांनी त्याला वाचविण्यासाठी तलावात धाव घेतली.
मात्र, दुर्दैवाने या प्रयत्नात दोघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने दोघांना तलावातून बाहेर काढण्यात आले.
तत्काळ उपचारासाठी त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची प्राथमिक माहिती आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे खवरी परिसरात शोककळा पसरली असून, पुढील तपास संबंधित प्रशासनाकडून सुरू आहे.




