जामनेरमध्ये भीषण रिक्षा अपघात; चार ते पाच महिला आणि तीन पुरुष जखमी

जामनेर | प्रतिनिधी
जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी एका प्रवासी रिक्षाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात चार ते पाच महिला आणि तीन पुरुष जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसून, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

error: Don't Try To Copy !!