१४ व १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघांची जिल्हास्तरावर निवड
जामनेर : प्रतिनिधी
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जामनेर तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत पळासखेडे मिराचे येथील नि. पं. पाटील विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत दुहेरी यश संपादन केले.
बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी रोटवद येथे १४ व १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत नि. पं. पाटील विद्यालय, पळासखेडे मिराचे येथील १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
तसेच १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघानेही दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळवला असून, या संघाचीदेखील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोन्ही संघांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आदरणीय दादासाहेब श्री. संजयरावजी गरुड, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन आबासाहेब श्री. भीमरावजी शेळके, संस्थेचे सचिव काकासाहेब श्री. सागरमलजी जैन, सहसचिव दादासाहेब श्री. यु. यु. पाटील, संस्थेचे ज्येष्ठ संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. रघुनाथ निळकंठ पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब श्री. दीपकरावजी गरुड, तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
यासोबतच वसतिगृहाचे सचिव आ. श्री. गो. गो. सूर्यवंशी, स्थानिक कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, खेळाडूंचे पालक यांनीही विजयी खेळाडूंचे कौतुक करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जे. आर. पाटील सर, पर्यवेक्षक श्री. आर. पी. पाटील सर, क्रीडाशिक्षक श्री. डी. आर. चौधरी सर, तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी खेळाडूंच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.
१४ व १७ वर्षे वयोगटातील दोन्ही संघांनी मिळवलेले हे यश विद्यालयाच्या क्रीडा परंपरेला बळ देणारे असून, आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही पळासखेडे विद्यालयाचे खेळाडू दमदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. 💐🏆

