जिनियस मास्टर्स फाउंडेशन, जामनेर तर्फे उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल
जामनेर (प्रतिनिधी) : जिनियस मास्टर्स फाउंडेशन, जामनेर यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार’ सोहळ्यात जामनेर येथील प्रिय मित्र संतोष राठोड व रमाई लोखंडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे, विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी योगदान देणे, तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जिनियस मास्टर्स फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा हा सन्मान शिक्षकांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा असून, त्यांच्या शैक्षणिक योगदानाची राज्यस्तरावर दखल घेतल्याने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संतोष राठोड व रमाई लोखंडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मित्रपरिवार, सहकारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
“शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे ज्ञानाच्या कार्याचा गौरव होय,” अशी भावना यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली.

