विद्यार्थ्यांनी मनापासून शिक्षण घेतल्यास जीवन समृद्ध – श्री श्याम चैतन्यजी महाराज
जामनेर : प्रतिनिधी
शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण व अभ्यास केल्यास परिवारासह आयुष्याचे कल्याण होते. आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणात अमुलाग्र बदल होत आहे. ते सर्व बदल स्वीकारून विद्यार्थ्याने शालेय जीवनापासूनच आपला शिक्षणाचा पाया मजबूत करावा. आई-वडिलांच्या आज्ञेत राहून शिक्षकांनी शिकवलेले ज्ञान आत्मसात करावे व नियमित अभ्यास करावा. विद्यार्थी दशेत मनापासून शिक्षण घेतल्यास आपले पुढील आयुष्य समृद्ध व सुखमय होते असे मौलिक मार्गदर्शन येथील श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे गादीपती श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
जामनेर परिसरातील जी . प.होळहवेली , महुखेडा गारखेडा तांडा बुद्रुक*शाळेतील विद्यार्थ्यांनी निसर्ग रम्य अशा श्री गुरुदेव सेवाश्रमला भेट दिली. श्री राधा माधव यांचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी महाराजांची आशीर्वाद घेतले. यावेळी . जी.प.शाळेतील शिक्षक , व शिक्षिका भागवत मस्के, नितीन दहातोंडे, समाधान थोरात, विठ्ठल जाधव ,सौ कविता पाटील ,सौ जयश्री पाटील, संदीप गावंडे ,राजेंद्र सावळे, अमोल वंजारी आदी उपस्थित होते