प्रत्येक निवडणुकीत एकाच घरातील सदस्यांना उमेदवारी का?

जे बी एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी

जब्बार एस तडवी

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फरदापुर गणात राजकीय पक्षांकडून पुन्हा एकदा एकाच घरातील सदस्यांना उमेदवारी तिकीट दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व रोष उफाळून येताना व्यक्त होत आहे. प्रत्येक निवडणुकीत त्याच कुटुंबातील व्यक्तींनाच संधी दिली जात असल्याने सामान्य कार्यकर्ते व नव्या तरुण उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना जनतेतून पुढे येत आहे.
“पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्तांना डावलून घराणेशाहीला प्राधान्य दिले जाते,” अशी टीका स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. यामुळे लोकशाही मूल्यांना तडा जात असून पक्षांची विश्वासार्हता कमी होत आहे, त्यातच रस्ते, पाणी,आरोग्य, व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नाही निवडणूक आली की आश्वासनाचा पाऊस आणि नंतर मात्र शांतता असा अनुभव जनतेने वारंवार घेतला आहे यावेळी मात्र जनतेचा सूर बदललेला दिसत आहे घराणे नाही काम पाहिजे अशी स्पष्ट भूमिका फरदापुर गणात परिवर्तनाची लाट निर्माण होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे असेही मत व्यक्त होत आहे.
तरुण व सक्षम उमेदवारांना संधी न देता वारंवार एकाच घरातील सदस्यांना तिकीट दिल्यास निवडणुकीत याचा फटका पक्षांना बसू शकतो, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. याबाबत राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करून न्याय्य व पारदर्शक उमेदवार निवड प्रक्रिया राबवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

error: Don't Try To Copy !!