जैन इंटरनॅशनल स्कूल, जामनेर येथे विज्ञान व भाषा प्रदर्शन उत्साहात संपन्न

जामनेर | प्रतिनिधी
जैन इंटरनॅशनल स्कूल, जामनेर येथे दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी विज्ञान तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी विषयांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक मॉडेल्स, प्रयोग, भाषाविषयक चार्ट, कविता तसेच सर्जनशील लेखन सादर करून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली.

प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सचिव आदरणीय श्री. मनोज कुमारजी कावडिया व संस्थेचे सदस्य आदरणीय श्री. मयूर कावडिया प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका फिरोजा खान मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रदर्शनास शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना व सादरीकरणाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, भाषिक कौशल्ये तसेच सर्जनशीलतेला चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

error: Don't Try To Copy !!