गरुड विद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी यशस्वी

शेंदुर्णी : येथील दी शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑप सोसायटी संचलित आ.ग.र. गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता राठोड, डॉ. जितेंद्र वानखेडे, औषध निर्माता प्रियंका वानखेडे, आरोग्य सेविका हर्षा गवळी यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य परीक्षण पूर्ण केले. तसेच, काही विद्यार्थ्यांना किरकोळ तक्रारी असल्यास

त्यांच्यासाठी प्राथमिक उपचार करून पुढील तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंदुर्णी येथे पाठविण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व, स्वच्छता आणि आरोग्य जपण्याचे विविध उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. अनिता राठोड व डॉ. जितेंद्र वानखेडे यांनी आरोग्य जागृतीसाठी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या उपक्रमास विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चौधरी, पर्यवेक्षक व्ही. एम. शिरापुरे, पर्यवेक्षक विनोद पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या आरोग्य तपासणीला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

error: Don't Try To Copy !!