जामनेर : संत निरंकारी मिशनच्या वतीने परम पूज्य निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्संग व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत “मिशन अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन” या मोहिमेअंतर्गत जामनेर शहरातील जलशुद्धीकरण केंद्र सोनबर्डी येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या अभियानामध्ये जामनेर ब्रांच आणि सेवादल UNIT – 1359 चे सर्व सेवादल भाई आणि बहन यांनी सक्रिय सहभाग घेतला. सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या असीम कृपेने हे अभियान यशस्वीपणे पार पडले.
या प्रसंगी प्रल्हादजी वाघ, रतनसिंग परदेशी, देविदास पाटील, रवींद्र शिंदे, शंकर माळी, शालिग्राम घुले, नामदेव सुरळकर, देविदास चिंचोले तसेच जामनेर, नवी दाभाडी, सोनारी, बोरगाव, पहूर येथून अनेक सेवादल सदस्य उपस्थित होते.
