जामनेर पंचायत समितीमार्फत 9820 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास घरकुल मंजुरीपत्र वाटप

जामनेर रविवार, 23 फेब्रुवारी, 2025

जामनेर प्रतिनिधी (सुपडू जाधव )
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा क्रमांक दोन अंतर्गत देशभरात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेश देण्यात आले असून, त्यामध्ये जामनेर तालुक्यातील 9820 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. पंचायत समितीमार्फत लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले असून, त्यातील 7744 लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे 15,000 रुपये जमा करण्यात आले आहेत.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी बांधकाम अभियंता जे. के. चव्हाण,

माजी उपसभापती नवल राजपूत, माजी पंचायत समिती सदस्य अमर पाटील, रमण चौधरी, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, माजी सरपंच कमलाकर पाटील, तुकाराम निकम, शांताराम बिलोरे, धनराज मोरे, आनंदा लावरे, जितेंद्र माळी, विस्तार अधिकारी अशोक पालवे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला एकूण ₹1,46,000 अनुदान मिळणार आहे. पहिला हप्ता जमा झाल्यानंतर लाभार्थ्यांनी तात्काळ घरकुल बांधकाम सुरू करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असून, सरकारच्या घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.

error: Don't Try To Copy !!