सावळदबारा ग्रामपंचायतचे मुद्दामहून येणाऱ्या वॉटर सप्लाय कडे दुर्लक्ष
मेन पाईपलाईन वरती प्रेशर व्हाल फोडून व गावाजवळ अवैधरित्या नळ कनेक्शन
सोयगाव तालुका.. प्रतिनिधी जब्बार एस तडवी
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व ग्रामपंचायतबॉडी व ग्रामसेवक यांच्या नाहक हलगर्जीपणामुळे देव्हारी पिंपळवाडी इथून वाटर सप्लाय विहिरीवरून येणारी मेन पाईपलाईन वरती देव्हारे येथील शेतकऱ्यांनी प्रेशर व्हाल फोडून आपल्या शेतात शेती मालाला व इतर पिकांना पाणी देण्यासाठी नळ जोडणी पाईपलाईन करून घेतली आहे व त्यातूनच नव्हे तर सावळदबारा फाट्याजवळ सुद्धा काही अज्ञात लोकांनी नळ कनेक्शन घेतलेले आहे ग्रामपंचायत सावळदबारा कार्यालयाला व संबंधित सरपंच व सर्व सदस्यांना माहिती असून सुद्धा या अवैधरित्या नळ कनेक्शन घेतलेल्या लोकांवर काहीही कारवाई न करता 24 तास पाणी सुविधा देण्यात येत आहे पाणी वॉटर सप्लाय विहीर व मोटार ही सावळद बारा ग्रामपंचायतची व अवधरीत्या पाणी उपसा तेथील शेतकरी काही लोक सर्रासपणे शेतीला व इतर कामाला पाणी घालत आहे सावळदबारा गावामध्ये वाटर सप्लाय टाकीमध्ये उशिरा पाणी येते आठ-दहा दिवसाआड पाणी येत आहे यांचा नाहक त्रास गावकऱ्यांना भोगाव लागत आहे ग्रामपंचायत कार्यालयाने अवैधरित्या नळ कनेक्शन वरती कारवाई न केल्याने काही देणे घेणे करून नळ कनेक्शन देण्यात आले आहे अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये चालू आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद कार्यालयातर्फे याची सखोल चौकशी करून ग्रामपंचायत कार्यालय व त्या संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .
सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पाणी जास्त प्रमाणात लागत आहे अवैध नळ घेतल्याने कृत्रिम पाणी टंचाई भासू लागली आहे ग्रामपंचायत च्या दुर्लक्षामुळे नळ कनेक्शन घेतली जात आहे
जब्बार तडवी ,(सामाजिक कार्यकर्ते) सावळदबारा सर्कल