मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप –दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव वितरण शिबिर यशस्वी संपन्न
जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
प्रतिनिधी -सुपडू जाधव
आपल्या जिद्दीला साथ माणुसकीची!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली एक स्तुत्य उपक्रम जामनेर येथे राबविण्यात आला. सक्षम देवगिरी प्रांत जळगाव, केशवस्मृती प्रतिष्ठान, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभाग, एस.आर. ट्रस्ट (मध्यप्रदेश), ALIMCO आणि जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव बसवणे, कॅलिपर्सचे मोजमाप घेणे आणि तात्काळ वितरण करण्याचे शिबिर कृषी उत्पन्न बाजार समिती, जामनेर येथे संपन्न झाले.
या उपक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित राहून दिव्यांग बंधू-भगिनींना कृत्रिम अवयव वाटप केले. आधुनिक तंत्रज्ञानाला माणुसकीची जोड मिळाल्यामुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद ही एक अत्यंत भावनिक आणि गौरवाची अनुभूती असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.या उपक्रमात अनेक दिव्यांगांना तात्काळ अवयव आणि सहाय्यक उपकरणे मिळाली, ज्यामुळे त्यांना आयुष्याला नव्याने सुरुवात करता येणार आहे. मंत्री महाजन यांनी आयोजकांचे मन:पूर्वक अभिनंदन करत पुढील काळात असे उपक्रम अधिक ठिकाणी राबवण्याचे आश्वासन दिले.
या अभिनव उपक्रमातून समाजात दिव्यांगांविषयी जागरूकता निर्माण होत असून, त्यांना आत्मनिर्भरतेचा मार्गही खुला होत आहे.