हिवरखेडा पूल ते वाघूर उपसा सिंचन योजना पंप हाऊस (मेजाय रस्ता) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भव्य भूमिपूजन
हिवरखेडा (ता. जामनेर) : हिवरखेडा पूल ते वाघूर उपसा सिंचन योजना पंप हाऊस (मेजाय रस्ता) या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
हा रस्ता वाघूर उपसा सिंचन योजना, जामनेर नगरपालिका वॉटर सप्लाय योजना तसेच आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांचा मुख्य संपर्क मार्ग असल्यामुळे, पाच किलोमीटर लांबीच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी वाघूर विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. यशवंत भदाणे, कार्यकारी अभियंता श्री. गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता श्री. विनोद पाटील, उपविभागीय अभियंता श्री. अमोल कुमावत यांची उपस्थिती होती. तसेच पंचायत समिती भाजप गटनेते श्री. अमर शिवाजीराव पाटील, सरपंच श्री. देविदास दशरथ जोहरे, पोलीस पाटील श्री. लिलाधर मालखेडे, माजी सरपंच डॉ. रमेश पाटील, श्री. जितेंद्र भिला पाटील, श्री. अमोल सुधाकर पाटील, श्री. उमेश महाजन, विकास सोसायटी चेअरमन श्री. अरूण शंकर चौधरी, तसेच चिचखेडा येथील बापू पाटील, नामदेव झावरे, सुभाष जासुद आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या डांबरीकरणामुळे परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री यांचे मनःपूर्वक आभार मानले.