जामनेर | प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सन २०२५ ते २०३० या कालावधीकरिता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. दिनांक ७ व ८ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आरक्षण सोडतीनुसार संबंधित ग्रामपंचायतींचे अंतिम आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
या आरक्षण तक्त्यानुसार विविध ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC), नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तसेच अनुसूचित जमाती अशा प्रवर्गांसाठी सरपंचपद राखीव करण्यात आले आहे.
आरक्षणाच्या तक्त्यात पळासखेडे बु., काळखेडे, टाकळी बु., तोरगाव, कादोळी, वाकी बु., बिलवाडी, सामरोद, देवळसगाव, जंगीपुरा, लेलेगाव, पिंपळगाव गो., शेरी, चिंचोली पिंप्री, वाघारी, वाकडी, जळांद्री बु., सोनाळे, भागादरे, सावखेडे, वाकी खु., लोणी, केकतभिंभोरा, बेटावद बु., राजणी, हिरवखेडा न वा यांसह पुढील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
आरक्षण निश्चित झाल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्या गावात कोणत्या प्रवर्गाला सरपंचपदाची संधी मिळणार, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार तसेच ग्रामस्थांचे आता आरक्षणाच्या तक्त्याकडे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, सरपंचपदाच्या आरक्षणामुळे अनेक गावांमध्ये महिला आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना नेतृत्वाची संधी मिळणार आहे. शासनाच्या नियमानुसार आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आगामी राजकीय समीकरणांनाही यामुळे वेग येण्याची शक्यता आहे
जामनेर तालुक्यात सरपंच आरक्षणाचा तक्ता जाहीर; ३७ ग्रामपंचायतींचे आरक्षण स्पष्ट
