वाकडी परीसरात महिनाभरापासून पावसाचा खंड; मका, कपाशीसह पिके धोक्यात

वाकडी.ता.जामनेर.दि.०९/०९/२६वाकडी परिसरात जवळपास एक
महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने बहरात आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, कडधान्य पिकांचीही फुलगळ झाल्याने उत्पादनाची आशा मावळली आहे.
कोरडवाहू शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आधार असलेल्या कपाशी पिकालाही फुलपाती गळतीचा फटका बसत असून,आगामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांची माती झाल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे, पावसाच्या प्रतीक्षेत झोकात आलेल्या मक्याला पाण्या अभावी दाणे भरले नाहीत, परिणामी दाणे विरहित कणसे आता जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, कडधान्य पिके बहरात आल्यानंतर फुलगळती झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे, कपाशीवरही फुलपाती गळती सुरू आहे,
खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत,एक महिन्यांपासून पाऊस नाही, यावर शेतकऱ्यांच्या समस्यांचा परिस्थितीजन्य आवाज उठवून त्याचे वेळेवर निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत,शासनाने योग्य वेळी मदत केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार नाही,अशी शेतकरी बांधव करीत आहे
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पदरी दरवर्षी कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ येतो,मात्र, शेतमालाला योग्य भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जीवन जगता येईल,यंदा तर खरीप हंगाम हातचा गेल्याचे चित्र आहे, शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी,अशी चर्चा शेतकरी करीत आहेत.

error: Don't Try To Copy !!