जळगाव येथील जी.एस.ग्राउंड मैदानावर सूर्या फाऊंडेशन यांच्यावतीने खान्देश करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.याठिकाणी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था,शिक्षक,महिला यासह इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचा सन्मान करण्यात येत आहे.
यावेळी सामाजिक,शैक्षणिक, क्रिडा, पर्यावरण,आरोग्य,महिला बाल विकास युवा कल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ.भगवानसिंग डोभाळ यांच्या राजकुंवर बहुद्देशीय संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे.यावेळी सन्मान स्वीकारण्यासाठी संस्थेच्यावतीने कोषाध्यक्ष श्री गणेश शिवसिंग डोभाळ,राजकुंवर कॉलेज फर्दापूरचे उपप्राचार्य डॉ अंबरसिंग बेडवाल, प्रा.ईश्वर चोरडिया हे उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.भगवानसिंग डोभाळ ,सचिव सौ संगीता डोभाळ,प्रशासकीय अधिकारी श्री अमित राजपूत, यांच्यासह संस्थेचे सदस्य सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक व सहकारी यांनी अभिनंदन केले आहे.


