
जामनेर तालुक्यातील आगामी काळातील ग्रामपंचायतीच्या १०७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तारीख जाहीर करण्यात आली आहे.
यामधे जामनेर तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत २१ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजता सोडत जाहीर करण्यात येणार आहे.
यामधे खालील प्रमाणे जागा सोडत होणार आहे.अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे-१०, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-१५, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२८, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-५४, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-५, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ८, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १४, सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२७ – एकूण अ बकड – ५४. याप्रकारे सोडत निघणार आहे.