निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

पळसखेडे (मिराचे), दि. १४ एप्रिल –
धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि., शेंदुर्णी संचलित नीळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळसखेडे मिरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक किरण सोनवणे होते. यावेळी मुख्याध्यापक विकास रघुनाथ पाटील, पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर, उपशिक्षक संदीप सोनवणे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मुख्याध्यापक विकास पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची प्रसंगिकता विषद केली. पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर आणि संदीप सोनवणे सर यांनीही आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनीही आपल्या प्रभावी भाषणांतून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा गौरव केला. कार्यक्रमाचे संयोजन व सुत्रसंचालन तीर्थराज इंगळे सर यांनी प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शनाने झाला, डी. आर. चौधरी सर यांनी केले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेचे भान आणि संविधानिक मूल्यांची जाणीव जागवली गेली.

error: Don't Try To Copy !!