गरुड विद्यालयात विद्याथ्यांनी स्वता बनवले रंगबेरंगीआकाश कंदिल.

शेंदुर्णी – येथील आ ग.र.ग माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी रंगबेरंगी आकाश कंदिल बनवले..
आपल्या घरासाठी नेहमी आपण चांगल्या प्रकारचे सुंदर दिसावे म्हणून बाजारातून आकाश कंदील खरेदी करत असतो परंतु स्वताच्या हाताने आकाश कंदिल बनवून ते घरी लावाणे. यात मुलांना वेगळा आंनद मिळतो.मुलांनी चांगल्या प्रकारचे आकाश कंदील बनवण्याचे विचार करून ते प्रत्यक्ष करून दाखविले यासाठी वर्गांमध्ये शिकवण्याच्या विषयामध्ये कार्यानुभव अंतर्गत हा विषय प्रसंगोपात सोपे प्रकार मध्ये शिकविला जातो यासाठी विद्यालयाचे सहशिक्षक श्री जी टी कुमावत सर यांनी मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आकाश कंदील तयार करण्यासाठी मार्गदर्शन

केले होते विद्यार्थ्यांनी यासाठी लागणारे साहित्य खरेदी करून कमी खर्चामध्ये सुंदर व आकर्षक असे आकाश कंदील तयार केले यामध्ये प्रामुख्याने कलाशिक्षक श्री डी एच बारी सर व श्री एस आर चव्हाण सर यांनी सुद्धा सहकार्य केले यासाठी इयत्ता आठवीचे वर्ग आकाश कंदील बनवण्यासाठी घेण्यात आले उपक्रम बनवत असताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस चौधरी सर ,पर्यवेक्षक श्री व्ही एम शिरापुरे सर .किमान कौशल विभागाचे प्राध्यापक श्री शैलेंद्र शेळके सर ,श्री राहुल गरुड सर ,श्री सुरवाडे सर .उपक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते तसेच इयत्ता आठवीच्या वर्गाचे सर्व वर्गशिक्षक यांचेही सहकार्य मिळाले हा चांगला आणि स्तुत्य उपक्रम म्हणून घेण्यात आला .हा दरवर्षी कार्यानुभव अंतर्गत उपक्रम घेण्यात येतो .शिका आणि कमवा यासाठी पण हा उपक्रम घेण्यात येतो .वर्षामध्ये स्वबळावर कौशल्य निर्माण करून रोजगारही मिळवला जाऊ शकतो

error: Don't Try To Copy !!