जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
जामनेर – आगामी जामनेर नगरपरिषद आणि शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) स्वबळावर लढविण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच स्थानिक नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
जामनेर नगरपरिषदेच्या १३ प्रभागांमध्ये पक्ष २६ उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. नगराध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आली.
सर्व प्रभागातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी करून योग्य व लोकप्रिय उमेदवारांची निवड करण्यात येणार असून, लवकरच त्यांच्या नावांची अधिकृत घोषणा होणार आहे.
या निर्णयामुळे जामनेर व शेंदुर्णी परिसरात राष्ट्रवादी अजित पवार गटाने निवडणुकीच्या रणांगणात जोरदार तयारी सुरू केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बैठकीचे अध्यक्षस्थान नानाभाऊ पाटील यांनी भूषवले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अरविंदभाऊ चीतोडिया यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी स्थानिक पातळीवरील मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
