जामनेर (प्रतिनिधी):
जामनेर नगरपरिषदेच्या वतीने आज विविध विकासकामांचे भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळे जल्लोषात पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे मंत्री गिरीशभाऊ महाजन होते. त्यांच्या हस्ते अनेक महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पक्षपदाधिकारी तसेच शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निमित्ताने जामनेर शहरातील नागरिकांना सुविधा पुरवणारी, शहराचा विकास वेगाने करणारी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत.
लक्ष्मी कॉलनी (गट क्र. 391/2) — कंपाउंड वॉल व लादीकरण — 64.51 लाख, गिरिजा कॉलनी (गट क्र. 458) — संतोषी माता मंदिर परिसरात क्लब हाऊस बांधकाम — 79.36 लाख, पाचोरा रोड (गट क्र. 206) — क्लब हाऊस व कंपाउंड वॉल — 128.93 लाख,शिव कॉलनी — कंपाउंड वॉल, लादीकरण व बगीचा विकास — 45.34 लाख, मधुबन कॉलनी (गट क्र. 43/2 व 431/2) — खुल्या जागेचा विकास — 47.13 लाख व 69.83 लाख,शहाजान शहावली दर्गा परिसर — सौंदर्यीकरण व विकास कार्य — 100 लाख, विवेकानंद नगर — व्यायामशाळा बांधकाम — 49.82 लाख
गट क्र. 292/2 — व्यायामशाळा बांधकाम — 72.72 लाख
गट क्र. 5 — कुस्ती आखाडा बांधकाम — 52.74 लाख
या सर्व कामांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी नितीन बागुल आणि नगरपरिषद कर्मचारीवृंद यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाद्वारे जामनेर शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
