जामनेर (प्रतिनिधी):- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील अंतिम वर्षातील कृषिदूत सुशांत जाधव, पवन बुवा , संग्राम पवार आणि सौरभ पाटील यांनी प्राचार्य डॉ. शैलेश तायडे आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम गोणशेटवाड , कार्यक्रम अधिकारी प्रो. व्हि.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मधुरम नर्सरी येथे भेट देऊन गट चर्चा प्रात्यक्षिक राबविले.

मधुरम नर्सरीचे संचालक मा.श्री.योगेश पाटील यांनी रोपवाटिका (Nursery) व्यवस्थापन म्हणजे बियाणे, कलमे यांपासून रोपे तयार करणे, त्यांची योग्य निगा राखणे (पाणी, खत, कीटकनाशके), आणि योग्य पद्धतीने विक्री करणे यासाठीचे नियोजन होय. यशस्वी नर्सरीसाठी वनस्पतींची गरज, सिंचन, खत व्यवस्थापन, तापमान नियंत्रण, रोग-कीड नियंत्रण आणि मार्केटिंगचे ज्ञान आवश्यक आहे, ज्यात नियोजनबद्ध काम आणि रोपांविषयीची आवड यांची माहिती जाणून घेतली.
