पिंपरी नांदू (ता. मुक्ताईनगर) येथे उत्साहात शिवजयंती साजरी

पिंपरी नांदू (ता. मुक्ताईनगर) – पिंपरी नांदू ग्रामपंचायतच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. गावातील मुख्य चौकात उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सरपंच प्रतिभा पाटील, उपसरपंच योगेश कोळी तसेच सदस्य भागवत पाटील, किशोर पेटारे, विशाल चौधरी, प्रतिभा निकम व दिनकर निकम यांच्या उपस्थितीत श्री हरी चौधरी व हरी कोळी यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मधुकर भोई यांनी आरती केली तर अतुल चौधरी यांनी श्रीफळ फोडून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

यावेळी विनोद भोई, आजिनाथ कोळी, शांताराम चौधरी, प्रमोद भोई, चिंधूलाल भोई, वैभव भोई, रितेश कोळी, चेतन न्यावी, विजय कोळी, मयूर कोळी, गणेश कोळी यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत अधिकारी कैलास भगत, ग्रामपंचायत शिपाई समाधान कोळी तसेच पाणीपुरवठा कर्मचारी विकास कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Don't Try To Copy !!