सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला दिला चोप

सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला दिला चोप

🌷जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर 🌷

दिनांक ,:6/04/2026 रोजि बुलढाणा जिल्ह्यातील लोणी गवळी गावातील एका प्राथमिक शाळेत असा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला. आहे एका 58 वर्षीय नराधमाने तिसरी मध्ये शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर, गावकऱ्यांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील लोणी गवळी गावातील प्राथमिक शाळेत तिसरीत शिकणाऱ्या एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीसोबत 58 वर्षीय शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. घटना गावातील नागरिकांना माहीत पडताच शेकडोंचा जमाव शाळेवर चालून गेला. गावातील

नागरिक आणि महिलांनी या शिक्षकाला चांगलाच चोप देत . तात्काळ या घटनेची माहिती डोनगाव पोलिसांना देण्यात आली त्यानंतर नराधम आरोपी शिक्षक महादेव आत्माराम मानतोडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, गावकरी पोलिसांना या शिक्षकाला घेऊन जाण्यास नकार करत होते व गेल्या तीन तासांपासून शाळेत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, शेवटी पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढत या आरोपी शिक्षकाला डोनगाव पोलीस स्थानकात आणले आहे, सध्या गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे हा नराधम शिक्षक येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहे. सेवानिवृत्तीला अवघा दीड महिना बाकी असताना आणि वयोवृद्ध असतानाही नराधम शिक्षकाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासण्याचं काम केलंय. सध्या जानेफळ पोलीस स्थानकाच्या बाहेर मोठी गर्दी असून शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

error: Don't Try To Copy !!