शेंदुर्णी, प्रतिनिधी : धी. शेंदुर्णी से. एज्युकेशन को-ऑप. सोसायटी संचलित आ.ग.र. गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, शेंदुर्णी येथील एसएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाने 94.90 टक्के इतका उल्लेखनीय निकाल मिळविला आहे. विशेष म्हणजे सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
विद्यालयातून एकूण 471 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 447 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेत 201 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले असून 34 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.
सेमी माध्यमातून कु. गौरी गोपाल शिनकर हिने 97 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. मानसी अमोल पाटील व कु. गौरी संजय आगे यांनी प्रत्येकी 96.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. कु. स्नेहल दगडू घनघाव हिने 96 टक्के गुणांसह तृतीय, कु. वैष्णवी मोहन पाटील हिने 95.60 टक्के गुणांसह चतुर्थ तर चि. दर्शन मनोज कापुरे याने 94.80 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला.
मराठी माध्यमातून चि. हितेश दीपचंद जाधव याने 90.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. खुशी सुनील डांबरे हिने 89.60 टक्के गुणांसह द्वितीय, कु. मयुरी गणेश पाटील हिने 89 टक्के गुणांसह तृतीय, कु. हर्षाली अमर सूर्यवंशी हिने 87 टक्के गुणांसह चतुर्थ तर कु. चेतना हिम्मत मोहने हिने 86.60 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड, व्हॉइस चेअरमन आबासो भीमराव शेळके, सचिव काकासो सागरमलजी जैन, सहसचिव दादासो यू.यू. पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड, वस्तीगृह सचिव गो.गो. सूर्यवंशी, महिला संचालिका ताईसो उज्वला काशीद तसेच सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तसेच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती पी.एस. पाटील, उपप्राचार्य बी.एम. कुमावत, पर्यवेक्षक जे.एस. जुबंळे, विनोद पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
