भुसावळ रेल्वे मंडळ अंतर्गत विविध विकास कामांसंदर्भात डीआरएम कार्यालय, भुसावळ येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आढावा बैठक घेतली…

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ अंतर्गत रेल्वे विभागातील विविध विकास कामे व समस्यांसंदर्भात डीआरएम कार्यालय, भुसावळ येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत तसेच डीआरएम श्री. पुनित अग्रवाल यांच्या समवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवरील तसेच भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्रगतीपथावर असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच “पाचोरा–जामनेर” पीजे रेल्वे विस्तारीकरण प्रकल्प आणि “भुसावळ ते खंडवा” तिसरी व चौथी रेल्वे लाईन साठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेबाबतही चर्चा करण्यात आली.

रावेर लोकसभा क्षेत्रातील नांदुरा, मलकापूर, बोदवड, वरंगाव, निंभोरा, सावदा व रावेर आदी प्रमुख स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

रेल्वे प्रकल्पांमुळे शेतजमिनी बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या अडचणींचीही दखल घेण्यात आली असून, त्या प्रश्नांचे लवकरात लवकर निराकरण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी स्पष्ट सूचना दिल्या.

error: Don't Try To Copy !!