बालगंधर्व खुले नाट्यगृहाची तातडीने दुरुस्ती करा; रंगकर्मींनी आयुक्तांना दिले निवेदन
कलावंतांसाठी महत्त्वाच्या नाट्यगृहाची दुरवस्था; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
जालगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील कलावंत आणि रंगकर्मींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या बालगंधर्व खुले नाट्यगृहाची सध्या दुरवस्था झाली आहे. नाट्यगृहाची देखभाल आणि आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी आता रंगकर्मींनी केली आहे.
यासंदर्भात रंगकर्मींनी जळगाव महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. नाट्यगृहाची सद्यस्थिती पाहता कलावंत आणि प्रेक्षकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे रंगकर्मींनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले.
बालगंधर्व खुले नाट्यगृह हे जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती आणि आवश्यक सुविधांची पूर्तता करावी, अशी मागणी रंगकर्मींनी केली आहे. आता महापालिका प्रशासनाकडून याबाबत काय कार्यवाही केली जाते, याकडे रंगकर्मी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.






