कर्णकर्कश बुलेटचा आवाज बंद! जळगाव पोलिसांनी सायलेन्सरवर फिरवला रोडरोलर

*‘फटाका’ सायलेन्सरवर पोलिसांचा बुलडोझर; जळगावात अनेक सायलेन्सर जप्त*

*वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची खैर नाही; पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंचा इशारा*

जळगाव दि. 25(प्रतिनिधी) जळगाव शहरात बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. विशेष मोहिमेदरम्यान नियमबाह्य आणि मोठा आवाज करणारे बुलेटचे सायलेन्सर मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या या सायलेन्सरवर थेट रोडरोलर फिरवून त्यांचा चक्काचूर करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेटस्वारांना चांगलाच दणका बसला आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे. त्यामुळे बुलेटला कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्यांचे आता चांगलेच टेन्शन वाढले आहे.

error: Don't Try To Copy !!