चोपडा : तालुक्यातील एका परिसरात तीन अस्वलांनी दोन शेतमजुरांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात दोन्ही शेतमजूर जखमी झाले आहेत. जखमी शेतमजुरांनीच परिसरात तीन अस्वल असल्याची माहिती दिली आहे.
अस्वलांनी अचानक हल्ला केल्यानंतर इतर ग्रामस्थांनी आरडाओरड केल्याने अस्वलांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर ग्रामस्थांनी दोन्ही जखमी शेतमजुरांना तातडीने चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले.
जखमींची प्रकृती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून अस्वलांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.






