लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी; जुलैचा ₹1,500 हप्ता खात्यात जमा

जळगांव | प्रतिनिधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जुलै महिन्याचा ₹1,500 रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून, काही महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.

जुलै महिन्याचा हप्ता रखडल्यामुळे राज्यातील लाखो लाभार्थी महिला या रकमेची प्रतीक्षा करत होत्या. अखेर सरकारकडून हप्त्याच्या वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. जुलैच्या हप्त्यासाठी ₹344.74 कोटींचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर पात्र लाभार्थी महिलांना DBTच्या माध्यमातून पैसे पाठवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे जुलैचा हप्ता जमा होऊ लागल्याने लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून ₹3,000 एकत्र मिळणार असल्याची चर्चा यापूर्वी होती. मात्र ताज्या माहितीनुसार जुलै महिन्याचा ₹1,500 हप्ता स्वतंत्रपणे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्टच्या हप्त्याबाबत स्वतंत्र निर्णय आणि वितरणाची प्रक्रिया अपेक्षित आहे.

लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्याचे स्टेटमेंट तसेच मोबाईलवर आलेले DBT संदेश तपासावेत. खाते आधारशी लिंक असणे आणि योजनेच्या आवश्यक अटी पूर्ण असणे महत्त्वाचे आहे.

महत्त्वाचे : सर्व पात्र महिलांच्या खात्यात रक्कम एकाच वेळी जमा होईलच असे नाही. DBT प्रक्रियेनुसार हप्ता टप्प्याटप्प्याने जमा होऊ शकतो.

रक्षाबंधनाआधी जुलैचा ₹1,500 हप्ता मिळू लागल्याने लाडक्या बहिणींचा आनंद द्विगुणित झाला आहे.

error: Don't Try To Copy !!