गरुड विद्यालयाच्या एस.एन.दांडगे मॅडम यांचे राष्ट्रीय पातळीवरील हिंदी नवीकरण प्रशिक्षण यशस्वी

राष्ट्रीय प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने अभिनंदनपर सत्कार
शेंदुर्णी : आ.ग.र.गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस. एन. दांडगे मॅडम यांनी केंद्रीय संस्था,हैदराबाद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय पातळीवरील 500 वे हिंदी नवीनीकरण अभ्यासक्रम प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. हे प्रशिक्षण 10 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या कालावधीत संपन्न झाले.या प्रशिक्षणादरम्यान NEP 2020, भारतीय ज्ञान परंपरा,प्रभावी पाठ नियोजन,भाषा कौशल्यांचा विकास तसेच आधुनिक काळातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा शैक्षणिक क्षेत्रातील उपयोग या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.बदलत्या शैक्षणिक पद्धती आणि तंत्रज्ञानाशी शिक्षकांनी अद्ययावत राहून त्याचा प्रभावी वापर अध्यापन प्रक्रियेत करावा,यावर प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला.प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गिरीश डी.पवार,सहाय्यक प्राध्यापक, हैदराबाद विद्यापीठ तसेच वैभव गायकवाड, डीसीपी, हैदराबाद यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षणामध्ये एकूण 36 शिक्षकांचा सहभाग होता. त्यामध्ये 8 महिला व 28 पुरुष शिक्षकांचा समावेश होता. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.दांडगे मॅडम यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार राष्ट्रीय पातळीवरील हिंदी नवीकरण प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल एस.एन.दांडगे मॅडम यांचा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम.एन.कोळी, उपप्राचार्य बी. एम. कुमावत,पर्यवेक्षक पी.पी. पाटील व व्ही. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण पूर्ण करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल एस.एन. दांडगे मॅडम यांचे सर्व उपस्थितांनी अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला निश्चितच नवी प्रेरणा मिळाली आहे.

error: Don't Try To Copy !!