जामनेर : जामनेर शहराच्या इतिहासात प्रथमच श्री गोगाजी महाराज यांच्या पवित्र छडीचे आगमन झाल्याने शहरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रामदेव बाबा नगर, भुसावळ रोड येथे आयोजित करण्यात आलेला हा धार्मिक सोहळा मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने उत्साहात संपन्न झाला.
नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धार्मिक सोहळा पार पडला. यावेळी श्री तेजस पाटील, श्री जुतू काका पाटील, श्री अतिष भाऊ झाल्टे ,श्री दिपक भाऊ तायडे यांच्यासह जामनेर शहरातील सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
श्री गुरु गोरखनाथजी व श्री गोगाजी महाराज यांच्या कृपेने आयोजित या सोहळ्यास जामनेर शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. भाविकांनी श्री गोगाजी महाराजांच्या पवित्र छडीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
पवित्र छडीच्या आगमनामुळे रामदेव बाबा नगर परिसरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. जामनेरमध्ये प्रथमच असा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आल्याने नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांसह सर्व सहकारी व भाविकांनी मोलाचे योगदान दिले. “जामनेर शहराच्या इतिहासात प्रथमच श्री गोगाजी महाराजांच्या पवित्र छडीचे आगमन” हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.







