शहादा प्रतिनिधी : ग्रामपंचायत शहाणा येथील कथित गैरव्यवहार/भ्रष्टाचाराबाबत चौकशी होऊ नये, संबंधित व्यक्तींवर प्रशासकीय कारवाई होऊ नये, ग्रामसभा होऊ नये, ग्रामपंचायतीच्या कारभाराची माहिती ग्रामस्थांना मिळू नये तसेच श्री. सुनील सुळे यांच्याविरुद्ध दाखल तक्रारीवर कारवाई होऊ नये, या उद्देशाने शहादा मतदार संघाचे माजी अपक्ष उमेदवार गोपाल सुरेश भंडारी, जितेंद्र पारासिंग भंडारी, दीपक तडवी, पवनसिंग पवार, जगदीश डुडवे, सोमनाथ सुळे, जामसिंग सुळे सह समाजसेवकांविरूद्ध पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील पोलिस ठाणे शहादा येथे दिनांक २६/८/२०२६ रोजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक,दिव्यांग कर्मचारी सुनील सुळे सह काही समाजकंटकांनी दिलेली तक्रार अखेर मागे घेण्यात आली आहे. याऊलट मौजे शहाणा, ता. शहादा येथील ग्रामस्थ, महिला, शेतकरी व विद्यार्थी आपणास नमूद करतो की, दिनांक २६/०८/२०२६ रोजी काही व्यक्तींनी आमच्याविरुद्ध तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन, सामाजिक अशांतता निर्माण करणे, सोशल मीडिया व व्हॉट्सॲपद्वारे बदनामी व दमदाटी करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, शेतकऱ्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवणे, गावाची बदनामी करणे व शांतता भंग करणे इत्यादी गंभीर आरोपांची तक्रार पोलीस स्टेशन शहादा येथे केली आहे. सदर तक्रारीतील आरोप हे खोटे, तथ्यहीन व दिशाभूल करणारे असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.ग्रामपंचायत शहाणा येथील कथित भ्रष्टाचाराबाबत होणारी चौकशी व दिनांक २७/०८/२०२६ रोजी आयोजित ग्रामसभा रोखण्यासाठी तसेच श्री. सुनील सुळे, कृषी सहाय्यक, मंदाणे गट, ता. शहादा यांच्या विरोधातील कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कारवाई होऊ नये म्हणून समाजसेवक व ग्रामस्थांविरुद्ध खोटे व तथ्यहीन आरोप करून बदनामी, दमदाटी व सामाजिक असंतोष निर्माण करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध चौकशी करून गुन्हे दाखल करून कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार गोपाल भंडारी सह शहाणा गावातील अनेक ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे शहादा येथे दिनांक २७/८/२०२६ रोजी दाखल केली आहे. त्यामुळे विरोधकांचा डाव चांगलाच फसला आहे.ग्रामसभेत याबाबत संबंधितांनी जाहीर माफी मागितली आहे.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, गोपाल सुरेश भंडारी हे गाव व समाजहितासाठी काम करणारे व्यक्ती असून ते ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. गोपाल भंडारी किंवा त्यांचे साथीदार तडीपार नाहीत ते चांगले समाजसेवक आहेत.जितेंद्र पारासिंग भंडारी, दीपक तडवी, पवनसिंग पवार, जगदीश डुडवे, सोमनाथ सुळे, जामसिंग डेमा सुळे तसेच समस्त ग्रामस्थ, महिला, शेतकरी व विद्यार्थी हे गावाच्या विकासासाठी कार्यरत असून ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात.ते कोणालाही धमकी देणे, शासकीय कामात अडथळा आणणे किंवा गावात अशांतता निर्माण करणे, खंडणी मागणे असा कोणताही प्रकार करत नाहीत.सुनील सुळे, कृषी सहाय्यक, यांच्या सांगण्यावरून खोटा तक्रार अर्ज देण्यात आला असून तक्रार अर्जावर आमच्या खोट्या सह्या करण्यात आल्या आहेत. तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा व फाईल बंद करण्यात यावा .









